Arvind Kejriwal Arrested: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, आप कार्यकर्ते रस्त्यावर; राज्यभर भाजपविरोधात आंदोलने

Delhi CM Arvind Kejriwal Arrested: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.
Delhi CM Arvind Kejriwal Arrested:
Delhi CM Arvind Kejriwal Arrested: Saamtv
Published On

AAP Protest News:

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. या अटकेनंतर सरकारकडून हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत.

पुण्यात आप कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन सुरू आहे. पुण्यातील भाजपच्या शहर कार्यालयासमोर आपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

सोलापूरमध्येही आप कार्यकर्ते आक्रमक

पुण्याप्रमाणेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सोलापूरमध्येही आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्हा परिषद गेट ते भाजप कार्यालयापर्यंत आप कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. आपच्या या आंदोनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस ही रस्त्यावर उतरले असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi CM Arvind Kejriwal Arrested:
Dharangaon News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन 

विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून निषेध करण्यात ये असून केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्र सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Delhi CM Arvind Kejriwal Arrested:
Dharashiv News: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फोडली; आता 'मनसे'च्या मागे... खासदार ओमराजेंचे भाजपवर टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com