Dharashiv News: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फोडली; आता 'मनसे'च्या मागे... खासदार ओमराजेंचे भाजपवर टीकास्त्र

Omraje Nimbalkar On BJP: राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Omraje Nimbalkar
Omraje Nimbalkar Saamtv

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. २२ मार्च २०२४

Dharashiv Loksabha Constituency News:

राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ओमराजेंचा मतदार संघात गावभेट दौरा सुरू असून गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

"देशातील जगातील एक नंबरची पार्टी ही भाजप आहे. पण खरंच देशात एक नंबर पार्टी असती तर उद्धव ठाकरे यांची सेना फोडण्याची वेळ आली असती का? असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्यावर ईडी, सीबीआयची धाड टाकून आमच्याकडे येतो का, जेलात जातो? असे म्हणत शिवसेना फोडली," असा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला.

"त्यानंतर पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली. अजित पवार यांनी 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला, म्हणून ही भ्रष्टाचारी पार्टी आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. त्यानंतर 7 व्याच दिवशी तेच अजित पवार त्यांच्याच मंञिमंडळात. फक्त उपमुख्यमंत्री नाही तर तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच हातात दिल्या," असा टोलाही ओमराजे निंबाळकर (Omraje Naik Nimbalkar) यांनी लगावला.

Omraje Nimbalkar
Gadchiroli News : नक्षल समर्थकास अटक; पकडणाऱ्यास शासनाने जाहीर केले होते दीड लाखाचे बक्षीस

"राष्ट्रवादी फोडुन ही गपचूप न बसता काँग्रेसच्या मागे लागले. अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळा म्हणून त्यांना फोडले अन् आता राज ठाकरे यांच्या मनसेला तु आमच्याकडे ये म्हणत मागे लागले अशी टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. भाजपाच्या बोलण्यात व वागण्यात अंतर पडले म्हणून ही वेळ आली," असेही ओमराजे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Omraje Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar : माढा लाेकसभा मतदारसंघाची माहिती नसणा-यांना दौरा करावा लागतो; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील माेहिते पाटलांना चिमटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com