Manoj Jarange Patil press conference details : धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा आदोंलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ उडाली. मनोज जरांगे यांनी बीडमधील कांचन, आंतरवालीमधील बडे या दोघांचीही नावे घेतली. त्याशिवाय त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबतही गंभीर वक्तव्य केलेय. अटक होण्याआधी आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बोलणं झाले, सगळ्या नेत्यांनी शीट तपासा, फडणवीससाहेब तुम्हाला काही दिलं असेल तर चेक करा, असेही ते म्हणाले.
जालना पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याचे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्याबद्दलही मोठं वक्तव्य केलेय. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याबद्दल काय विषय आहे हा त्या पोरांना माहिती आहे. बावनकुळे यांच्या भाच्याबद्दल देखील त्यांना माहिती आहे. वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत. पण ही नसली टोळी संपणं गरजेचं आहे. आरोपीकडे पंकजा मुंडे यांच्याबद्दल खूप काही माहिती आहे. पंकजा मुंडें बद्दल खूप घाण विचार आहेत. जे सत्य आहे ते तुम्ही त्या आरोपीकडून काढा. आरोपीकडेकडे कराड, सुरेश धस, संतोष देशमुख यांच्या भावाबद्दल देखील माहिती आहे, असा गंभीर आरोप केलाय.
आंतरवाली परिसरातील बडे नावाचा माणूस आहे. त्यांची 10-11 लोक आहेत. तुम्ही आम्हाला गाडी घेऊन द्या आम्ही गाडी ठोकतो, असं हे दोघे धनंजय मुंडेंना म्हणाले होते. धनंजय मुंडे म्हणाला माझ्याकडे दुसऱ्या राज्यातील पासिंगची जुनी गाडी आहे . धनंजय मुंडेंचा कांचन नावाचा माणूस आहे. त्याने या आरोपींची भेट घेतली होती. त्यांना घेऊन तो परळीला गेला होता.
बीडच्या रेस्ट हाऊसमध्ये मोठी बैठक होती. तिथे धनंजय मुंडेंनी वेळ दिला. धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अडीच कोटी रूपयांमध्ये यांची डील ठरली होती. माझ्या हत्येचा कट, सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली. त्याने सर्व करायला लावले होते. मला गाडीने उडवायचा यांचा प्लान होता, असे जरांगे पाटील म्हणाले.
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे या आरोपींची वाट पाहत होता. काही सापडत नाहीये असं काही तरी चर्चा झाली. यांची वारंवार धनंजय मुंडे सोबत भेट झाली. दिवाळीमध्ये पुन्हा एकदा यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. यामध्ये आणखी दहा-११ जण आहेत. नंतर आरोपी म्हणाले तुम्ही गाडी द्या आम्ही गाडीला गाडी ठोकतो. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले, पण करणाऱ्यांपेक्षा करून घेणारा धनंजय मुंडे हे आहेत, असा खळबळजनक आरोप जरांगेंनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.