Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

24K, 22K, 18K Gold Rates : देशात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर आज कमी झाले असून प्रति तोळा सोनं ५५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या दरात घट झाली असून चांदीचे दर मात्र जैसे थे राहिले आहेत.
Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv
Published On

Gold Price Today; 7 Nov 2025 Gold Rates : देशात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात गुरूवारच्या तुलनेत घसरलेत. डॉलरच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्ये मात्र कोणताही कोणताही बदल झाला नाही. लग्नसराईच्या आधी सोनं स्वस्त झाल्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा उसळी येऊ शकते. (Gold Rate Today: 24K, 22K, 18K Gold Prices Drop Again | Check Latest Rates)

Gold Price In India Today (आजचे सोन्याचे दर काय?)

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून डिसेंबरमध्ये व्याजदरात पुन्हा कपात करण्यात येणार असल्याची समोर येताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. पण आज डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला. शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. गुरूवारच्या तुलनेत प्रतितोळा ५५० रूपयांनी सोनं स्वस्त झाले आहे.

कोणत्या शहरात सोन्याचे दर काय?

शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,२१७ रुपये इतकी आहे. ही किंमत गुरुवारपेक्षा ५५ रुपयांनी कमी आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ११,२०३ रुपये इतकी आहे. यामध्ये गुरूवारच्या तुलनेत ५० रूपयांची घसरण झाली. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,१६७ रुपये आहे. हे सोनं प्रतिनि ग्रॅम ४१ रूपयांनी स्वस्त झालेय.  दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम १२,२१७ रुपये इतकी आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि केरळमध्येही हीच किंमत आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १२,२९५ रुपये इतकी आहे आहे.

प्रति तोळा सोन्याची किंमत किती?

देशात आज प्रति तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत १,२२,१७० रुपये इतकी आहे. गुरूवारी १,२२,७२० इतकी रूपये होती. म्हणजेच, सोनं ५५० रूपयांनी स्वस्त झालं आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा आजच दर १,१२,०३० रुपये इतका आहे. तर  १८ कॅरेट सोन्याचीकिंमत ९१,६७० रुपये आहे. गुरूवारच्या तुलनेत अनुक्रमे ५०० आणि ४१० रूपये इतके स्वस्त झालेय.

देशात चांदीचे दर किती? (Silver Price In India)

सोन्याच्या किंमतीमध्ये एकीकडे चढउतार सुरू असतानाच चांदीचे दर मात्र जैसे थे राहिलेत. गुरुवारच्या तुलनेत आज सराफा बाजारात कोणताही बदल झालेला नाही. गुरुवारी चांदीची किंमत प्रति किलो १,५२,५०० रुपये इतकी होती. आजही चांदीची किंमत तेवढीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com