Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

Maratha agitation leader targeted conspiracy Maharashtra : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून अडीच कोटींच्या सुपारीचा आरोप समोर आला आहे.
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On
Summary
  • मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला आहे.

  • जालना पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

  • अडीच कोटींच्या सुपारी देऊन हत्या करण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

  • मराठा समाजाने जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

Manoj Jarange Patil murder conspiracy case details : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली अन् महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. गुरूवारी याप्रकरणी जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलेय. या प्रकरणात बीडमधील परळीच्या एका बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांकडून याबाबत कसून तपासही केला जातोय. पण मनोज जरांगे पाटील याच मुद्द्यावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील सकाळी ११ वाजता पत्रकारांसोबत संवाद साधणार आहे. जरांगे पाटील यामध्ये मोठा खुलासा करणार असल्याचे समोर आलेय. मनोज जरांगे पाटील सुपारी देणाऱ्या त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करणार का? की याला वेगळेच वळण मिळणार? जरांगेंच्या हत्येचा कट रचला कुणी? याची चर्चा सुरू आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटीत पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. हत्येचा कट रचल्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील मोठा गौप्यस्पोट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरूवारी मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?
IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

याप्रकरणी जालना पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल आहे. त्यांची सध्या कसून चौकशी पोलीस करत आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिली असून यामध्ये बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. याबाबत मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?
Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मराठा समाज बांधवात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामूळे या प्रकरणी कट रचणारे व मुख्य सुञधार यांचा शोध घेऊन आरोपीस कठोर शासन करावे व जरांगे पाटील यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी धाराशिवमधील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?
Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com