

बीडच्या पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीत बोट बुडाली
या दुर्घटनेत बुलडाणा जिल्ह्यातील २ महिला भाविकांचा मृत्यू
बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे घडली घटना
१२ हून अधिक महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पुरुषोत्तम पुरी येथे आज मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी गोदावरी नदीपात्रात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. या बोट दुर्घटनेत बुलडाण्यातील दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत १२ महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीतून दर्शनासाठी जात असताना ३५ ते ४० महिलांना घेऊन जाणारी बोट आज सकाळी बुडाली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत बुलडाणा जिल्ह्यातील कुंभेफळ येथील कांताबाई ज्ञानदेव आंधळे (६० वर्षे) आणि चोरपांगरा येथील प्रमिला शेषराव राठोड (५५ वर्षे) या दोन महिलांचा मृत्यू झाला.
या बोट दुर्घटनेमध्ये १२ महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. लोणार तालुक्यातील कुंभेफळ, बोरी, किन्ही आणि बीबी येथील १७ महिला दर्शनासाठी गेल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व महिला सुरक्षित आहेत. ही घटना जेव्हा घडली तेव्हा परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यावर्षी देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे भाविक गोदावरी नदीपात्रातून बोटीने प्रवास करत होते. पण नदीच्या मध्यभागावर पोहचताच बोटीचा तोल गेला आणि बोट उलटली. बोटीमध्ये जास्त प्रवासी बसवल्यामुळे ही घटना घडली. बोट उलटल्याचे कळातच किनाऱ्यावरील स्थानिक आणि नावाडींनी मदतीसाठी नदीत उड्या मारल्या त्यांनी ३५ भाविकांचे प्राण वाचवले. पण या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला.
सिंधुबाई वाघ
कमलाबाई फड
प्रतिभा फड
कमलाबाई कांगणे
शिवगंगा कांगणे
पार्वती सोळुंके
पार्वती नागरे
बेबी कांगणे
शिवगंगा फड
गोदावरी फड
सुमित्रा फड
संगिता मुंडे
प्रयागबाई डोळे
कांता ज्ञानदेव आंधळे
प्रमिला शेषराव राठोड
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.