Beed Boat Accident : बीडमध्ये काळीज हेलावणारी दुर्घटना! ५० ते ६० भाविकांची बोट गोदावरी नदीत उलटली; अनेक जण बुडाल्याची भीती

Beed Majalgaon pilgrim boat rescue operation : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीत अपघातग्रस्त झाली. बोटीत 50 ते 60 भाविक असल्याची माहिती असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Beed Boat Accident
Beed Boat AccidentsAAM
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनीधी, साम टीव्ही मराठी

Purushottampur Godavari river boat accident news : बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास ५० ते ६० भाविक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक बोट चालकांकडून आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. काही भाविकांना बाहेर काढण्यात यश आले असून शोध सुरू आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या पवित्र अधिक मासानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील गोदावरी नदीपात्रातून भाविकांना बोटीच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीमध्ये अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Beed Boat Accident
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, २४ कॅरेट गोल्ड ₹४३०० नं स्वस्त, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

याच निष्काळजीपणामुळे आज भाविकांची बोट नदीपात्रात उलटून मोठा अपघात झाल्याचा आरोप केला जातोय. आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश आले आह. इतरांसाठी रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य) अजूनही सुरू आहे. या दुर्घटनेत काही लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीत अंदाजे ६० जण होते, त्यामधील २० जणांना वाचण्यात यश आले आहे. इतरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed Boat Accident
Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com