24 carat gold rate today in Mumbai Pune : सराफा बाजार उघडताच आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मुंबई, पुण्यासह भारतील महत्त्वाच्या शहरात सोन्याच्या दरात कपात नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घसऱणीचा परिणाम भारतातही झाल्याचे चित्र आहे. भारतात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ४३० रूपयांनी कमी झाला आहे. आज एक ग्रॅम सोन्याची किंमत ₹१४,८८६ इतकी झाली आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१३,६४५ असून, तो मंगळवारच्या तुलनेत ₹३९५ ने कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,१६४ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹३२३ ने कमी आहे.
स्पॉट गोल्डने ४,२०० डॉलरचा टप्पा ओलांडला आणि डिसेंबर २०२५ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. स्पॉट सिल्व्हरमध्ये आणखी घसरण झाली असून ते ६४ डॉलरची पातळीच्या खाली आले. डॉलरचे मजबूत होणे हा सोन्यासाठी आणखी एक नकारात्मक घटना आहे. आखाती देशातील संकटामुळे सोने आणि चांदीची विक्री वाढली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,८८६ आहे. मंगळवारच्या तुलने ₹४३० ने कमी आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ४३०० रूपयांनी स्वस्त झाला आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ₹१,४८,८६० इतकी आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १०० ग्रॅम ₹१४,८८,६०० आहे, जो कालच्या भावापेक्षा ₹४३,००० ने कमी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १३,६४५ रुपये असून मंगळवारच्या भावापेक्षा ३९५ रुपयांनी कमी आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ३९५० ने घसरून १,३६,४५० रुपये झाला आहे.
आज सोन्या-चांदीचे भाव का घसरले?
आज झालेल्या सोन्याच्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्याने सुरू झालेलं युद्ध आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इस्लामिक राजवटीवरील हल्ले थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच, दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. इस्रायल आणि इराण एकमेकांवरील हल्ले थांबवण्यास सहमत झाल्यानंतर लगेचच, अमेरिकेने इराणवर आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. यामुळे जगभरात दीर्घकाळ चालणाऱ्या ऊर्जा संकटाची आणि वाढत्या महागाईची भीती पुन्हा निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.