Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update, Yellow Alert : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, कोकणासह ३० जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. ४० ते ५० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATESaam Tv
Published On

Maharashtra Weather Update: उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी पावसाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात अखेर पावसाचे आगमन होणार असून आज ३० जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह जवळपास संपूर्ण राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होणार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसाळी वातावरणादरम्यान काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, तसेच विजांचा कडकडाटही होईल, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह जवळपास संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
Pune : पुण्यात रात्री १० नंतर अंडा भुर्जी, चायनीज, पान टपऱ्या बंद; पोलीस आयुक्तांचे कडक आदेश

'या' ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, परभणी, लातूर, धाराशीव, नांदेड, हिंगोली

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
संभाजीनगर जिल्ह्यात ७४ हजार महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पाहा आकडेवारी

सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये मान्सूनची हजेरी

बंगालच्या उपसागरावरून पुढे चाल करत मंगळवारी मान्सूनने संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीम राज्य व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागातही मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रावरून चाल न झाल्याने हर्णे, सोलापूरपर्यंत मॉन्सूनची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागासह, संपूर्ण तमिळनाडू, पश्चिम बंगालचा आणखी काही भाग, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशा, राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: HEATWAVE CONTINUES, RAIN ALERT ISSUED ACROSS STATE
Mumbai Monsoon : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com