Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

Theme cake safety guidelines : ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये स्पायडरमॅन थीम केकमधील धातूची पिन 3 वर्षीय मुलाने चॉकलेट समजून गिळली. एक्सरेमध्ये पिन आतड्यात आढळल्यानंतर पालकांची धावपळ उडाली.
Thane Hiranandani Estate Incident
Thane Hiranandani Estate IncidentSaam
Published On

Thane Hiranandani Estate Incident : बेकरीमधून तुम्ही सुद्धा डिझायनर किंवा थीम केक आणून आवडीने खाताय? तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. वाढदिवसाच्या एका केकमुळे ठाण्यातील पालकांसमोर एक अत्यंत मोठे संकट उभे राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिरानंदानी इस्टेट परिसरातील एका ३ वर्षांच्या चिमुरड्याने केक मधील धातूची पिन (तारा) चॉकलेट समजून गिळली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

स्पायडरमॅन थीम केक आणि बेकरीचा निष्काळजीपणा

ठाण्यातील प्रसिद्ध 'हिरानंदानी इस्टेट' (Hiranandani Estate) परिसरात ही घटना घडली. येथील एका कुटुंबाने आपल्या ३ वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी 'स्पायडरमॅन थीम केक' (Spiderman Theme Cake) ऑर्डर केला होता. या केकच्या सजावटीला आणि वरील फॉन्डंटच्या डिझाईनला आधार देण्यासाठी बेकरी चालकाने त्यात धातूच्या तीक्ष्ण तारा (पिन) वापरल्या होत्या. धक्कादायक म्हणजे केक तयार करताना अशा प्रकारच्या तारा वापरल्या आहेत, याची कोणतीही कल्पना बेकरीने पालकांना दिली नव्हती.

Thane Hiranandani Estate Incident
Mumbai Monsoon : मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने सांगितली तारीख

एक्सरे मध्ये दिसल्या आतड्यात पिन; पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

वाढदिवस झाल्यानंतर मुलाने केक खाताना त्यातील धातूच्या पिन्स चॉकलेट समजून थेट गिळल्या. हा प्रकार जेव्हा पालकांच्या लक्षात आला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाला तातडीने रुग्णालयात नेऊन डॉक्टरांकडून तपासण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने मुलाचा एक्सरे (X-Ray) केला असता, त्या लहान तीक्ष्ण पिन मुलाच्या थेट आतड्यामध्ये पोहोचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

Thane Hiranandani Estate Incident
संभाजीनगर जिल्ह्यात ७४ हजार महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पाहा आकडेवारी

डॉक्टरांनी मुलाच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवले होते. सुदैवाने, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य सल्ल्यानंतर तब्बल ४८ तासांनी या धातूच्या तारा नैसर्गिक रित्या (शौचावाटे) मुलाच्या शरीराबाहेर पडल्या. त्यामुळे या ३ वर्षांच्या चिमुरड्याचा जीव थोडक्यात वाचला आणि पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Thane Hiranandani Estate Incident
शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार! दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; महाराष्ट्र हादरला

ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील जीवशास्त्र शिक्षिका स्नेहा शेलार यांच्या ३ वर्षांच्या रेयांशसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. धातूचे तुकडे नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितपणे बाहेर निघाल्यानंतरही या घटनेने कुटुंबाच्या मनावर दीर्घकाळ भावनिक आघात कायम राहील.

आजकाल लहान मुलांच्या वाढदिवसाला विविध थीम केक किंवा डिझायनर केक आणण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, अशा केकमध्ये सजावटीला आधार देण्यासाठी अनेकदा टूथपिक, प्लास्टिकच्या काड्या किंवा धातूच्या तारांचा वापर केला जातो. त्यामुळे मुलांना केक देण्यापूर्वी पालकांनी तो स्वतः नीट तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.

Thane Hiranandani Estate Incident
TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com