शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर गोळीबार! दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या; महाराष्ट्र हादरला

Shrirampur Crime News : श्रीरामपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी धावत्या कारवर गोळ्या झाडल्या.
Shiv Sena Shinde faction leader firing in Shrirampur
Shiv Sena Shinde faction leader firing in ShrirampurSaam
Published On

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी

Shiv Sena Shinde faction leader firing in Shrirampur : अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने हल्लेखोराचा नेम चुकल्याने प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले. या घटनेनंतर श्रीरामपुरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास केला जात आहे. हल्ला का केला? यामागे नेमके कारण काय होते? दुचाकीचाही शोध घेतला जात आहे.

श्रीरामपुरात येथील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात नेम चुकल्यामुळे प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशांत कहाणे यांच्यावर हल्ला का केला? याचा तपास केला जात आहे.

Shiv Sena Shinde faction leader firing in Shrirampur
IPS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! १७९ आयपीएस अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या; कुणाची कुठे झाली नियुक्ती?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कहाणे सुरक्षितपणे बचावले.

Shiv Sena Shinde faction leader firing in Shrirampur
Today Horoscope : कोणाला धनलाभ, कोणाला मनस्ताप? वाचा मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य एका क्लिकवर

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या भागाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Shiv Sena Shinde faction leader firing in Shrirampur
Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com