IPS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! १७९ आयपीएस अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या; कुणाची कुठे झाली नियुक्ती?

IPS officers transfer list : पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करत १७९ आयपीएस आणि डब्ल्यूबीपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोलकाता पोलीस, एसटीएफ, गुप्तचर विभाग आणि विविध जिल्ह्यांमध्ये नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
 IPS officers transfer
IPS officers transferPTI
Published On

West Bengal 179 IPS officers transfer list : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर टीएमसीचे अनेक नेते ममता बॅनर्जींची साथ सोडत आहेत. आमदार-खासदारही टीएमसीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असतनाच पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल झाला आहे. राज्यातील तब्बल १७९ आयपीएस आणि डब्ल्यूबीपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोलकाता पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

पश्चिम बंगाल पोलीस विभागात सोमवारी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. बंगाल सरकारने १७९ आयपीएस आणि पश्चिम बंगाल पोलीस सेवा (डब्ल्यूबीपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सोमवारी बदल्या झालेल्या १७९ अधिकाऱ्यांपैकी १५१ आयपीएस अधिकारी आहेत, तर इतर सर्व डब्ल्यूबीपीएस अधिकारी आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर पोलीस विभागात झालेला हा पहिलाच मोठा बदल आहे.

 IPS officers transfer
Today Horoscope : कोणाला धनलाभ, कोणाला मनस्ताप? वाचा मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य एका क्लिकवर

कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणत्या विभागात नियुक्ती?

सोमवारी करण्यात आलेल्या बदलीत अनेक आयपीएस अधिकाऱ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. राजेश कुमार यादव आणि गौरव शर्मा यांची राज्य विशेष कृती दलात (एसटीएफ) पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिधाननगरचे माजी पोलीस आयुक्त मुरलीधर शर्मा यांची गुप्तचर विभागात पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुरलीधर शर्मा आता गुप्तचर विभागाचे नवे आयजीपी असतील.

 IPS officers transfer
Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

कोलकाता पोलिसांमध्येही मोठे बदल झाले आहेत. कुणाल अग्रवाल यांची गुन्हे शाखेचे नवीन अतिरिक्त आयुक्त म्हणून, तर मुकेश यांची कोलकाता सशस्त्र पोलिसांचे नवीन पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर बंगालमधील सिलीगुडीचे सय्यद वकार रझा हे नवीन पोलीस आयुक्त असतील. जॉय बिस्वास यांची राज्यात रेल्वेचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 IPS officers transfer
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

सूर्य प्रताप यादव यांच्याकडे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर सौम्या रॉय हे राज्य पोलिसांच्या अंमलबजावणी शाखेच्या वरिष्ठ अधीक्षक (एसएसपी) म्हणून काम पाहतील. त्याशिवाय कोलकाता पोलिसांच्या डीसी स्तरावरही मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये अनेक उपायुक्त-स्तरीय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चंद्रशेखर बर्धम हे डायमंड हार्बर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, तर के. सनी राज यांची पुरुलियाचे पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • इशानी पॉल – पोलीस उपआयुक्त, दक्षिण-पश्चिम विभाग

  • सायक दास – पोलीस उपआयुक्त, उत्तर विभाग

  • प्रवीण प्रकाश - पोलीस उपआयुक्त, मध्य विभाग

  • शिबा प्रसाद पात्रा- भंगार विभागाचे पोलिस उपायुक्त,

  • के. यू. गणपत - पोलीस उपआयुक्त, दक्षिण उपनगरी विभाग

  • वाय. एस. जगन्नाथ राव – पोलीस उपआयुक्त, गुप्तचर विभाग

  • सुबिमल पॉल - पोलीस उपआयुक्त, पूर्व उपनगरीय विभाग

 IPS officers transfer
Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com