Beed Boat Accident: अधिकमासात गोदावरीत ३५ भाविकांची बोट उलटली, एका महिलेचा मृत्यू, नदीपात्रात एकच खळबळ

Beed Purushottampuri boat accident latest update : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बोट नदीत उलटली.
Beed Purushottampuri boat accident latest update
Beed Purushottampuri boat accident latest updateAI
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Beed Purushottampuri boat accident latest update : बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात भीषण अपघात झाला आहे. ३५ हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ती नदीपात्रात उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीपात्रातून प्रवास करत असताना अचानक बोटीचा समतोल सुटला आणि ती उलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजेच ३५ हून अधिक भाविक स्वार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बोट उलटताच नदीपात्रात एकच खळबळ उडाली आणि वाचवण्यासाठी भाविकांनी टाहो फोडला.

Beed Purushottampuri boat accident latest update
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा क्रूर चेहरा! अफगाणिस्तानवर बॉम्ब हल्ला, ११ मुलांसह १३ जणांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, काहींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Beed Purushottampuri boat accident latest update
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, २४ कॅरेट गोल्ड ₹४३०० नं स्वस्त, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सध्या पवित्र अधिक मासानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गोदावरी नदीपात्रातून भाविकांना बोटीच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. पण अधिक पैशांच्या हव्यासापोटी बोट चालकांकडून बोटीमध्ये अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जाते. त्यामुळे बोटीची दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Beed Purushottampuri boat accident latest update
Thane : पालकांनो सावधान! मुलांसाठी 'थीम केक' आणताय? ठाण्यातील या धक्कादायक घटनेने उडेल झोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com