Shocking : बीड हादरलं! दोन तरूणांकडून तरुणीवर बलात्कार; एकानं लॉजवर नेलं, दुसऱ्यानं गुंगीचं औषध दिलं, ब्लॅकमेल करून सोनंही लुटलं

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे २० वर्षीय विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
BEED STUDENT ALLEGES DRUGGING, SEXUAL ASSAULT, BLACKMAIL; TWO ACCUSED ARRESTED IN AMBAJOGAI
BEED STUDENT ALLEGES DRUGGING, SEXUAL ASSAULT, BLACKMAIL; TWO ACCUSED ARRESTED IN AMBAJOGAISaam Tv
Published On
Summary
  • बीडच्या अंबाजोगाईत धक्कदायक प्रकार

  • २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले

  • दोन तरुणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

  • मंच्युरियनमध्ये गुंगीचे औषध मिक्स करून दिले

योगेश काशीद, बीड

Beed 20 Years Old Student Rape Case बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. इतकेच नाही तर पीडित तरुणीकडून तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळे सोने उकळले. असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एक २० वर्षीय तरुणी स्वरा (बदलेलं नाव ) अंबाजोगाई येथे एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होती. या दरम्यानच्या काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोन तरुणांशी झाली. ओळख वाढल्यानंतर दोघेही तिचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, महेश करपे याने तरुणीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने मंच्युरियन खाण्यासाठी दिले. ते खाल्ल्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर तरुणी बेशुद्ध पडल्याचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

BEED STUDENT ALLEGES DRUGGING, SEXUAL ASSAULT, BLACKMAIL; TWO ACCUSED ARRESTED IN AMBAJOGAI
Skin Care Alert : चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतायत? जाणून घ्या सुरुवातीची गंभीर लक्षणे

याशिवाय, दुसरा आरोपी पवन कराड यानेही तरुणीला गुंगीचे औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी धमकावून पीडित तरुणीकडून सुमारे तीन लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोने घेतल्याचेही समोर आले आहे.

BEED STUDENT ALLEGES DRUGGING, SEXUAL ASSAULT, BLACKMAIL; TWO ACCUSED ARRESTED IN AMBAJOGAI
Dadar Accident : मुंबईत भीषण अपघात! बेस्ट बसची वाहनांना धडक, २ जणांचा जागीच मृत्यू, १३ गंभीर

अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे अंबाजोगाईसह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com