Alisha Khedekar
कोड हा संसर्गजन्य आजार नाही. तो स्पर्शाने, संपर्काने किंवा एकत्र राहिल्याने पसरत नाही.
११-१२ वर्षांच्या मुलांमध्ये कोडची प्रकरणे वाढत आहेत. यामागे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदलती जीवनशैली कारणीभूत ठरत आहे.
मेलानोसाइट्स या रंग निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यास त्वचेवर पांढरे डाग दिसू लागतात.
चेहरा, ओठ, डोळ्यांभोवती, बोटे, कोपर, गुडघे आणि पायांवर लहान पांढरे डाग दिसणे हे कोडचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
व्हिटॅमिन बी१२, डी, यांच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
मानसिक तणाव रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. त्यामुळे कोडची समस्या वाढू शकते किंवा नवीन डाग निर्माण होऊ शकतात.
मुलांच्या त्वचेवर पांढरे डाग दिसल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात योग्य ठरते.
पांढरे डाग लपवण्यासाठी जास्त प्रमाणात मेकअप वापरल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात आणि संवेदनशीलता वाढू शकते.