Alisha Khedekar
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची राजकीय क्षेत्रातील शैली आपण नेहमी बघतो. मात्र अंदमान निकोबारमध्ये त्यांनी केलेल्या स्कुबा डायव्हिंगची सर्वत्र चर्चा आहे.
राहुल गांधी यांनी ग्रेट निकोबारच्या पाण्यात स्कूबा डायव्हिंग केले. यादरम्यानची पाण्याखालची दृश्य समोर आली.
स्कूबा डायव्हिंग करतानाचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाण्यामधील मनमोहक फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्कुबा डायव्हिंग सोबतच राहुल गांधी यांनी बोट सफारीचा आनंद घेतला. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत.
अंदमान निकोबारच्या समुद्रातून फिरताना बोटवरचा एक शांत बसलेला फोटो राहुल गांधी यांनी पोस्ट केला आहे.
राहुल गांधी यांचा समुद्रात तरंगतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ते पाण्यामध्ये आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.
अंदमान निकोबारच्या सफारी दरम्यान राहुल गांधी यांनी स्कुटीने प्रवास केला. याचे फोटो देखील समोर आले आहेत.