Alisha Khedekar
सर्वात आधी मान्सून अरबी समुद्रात दाखल होतो, त्यानंतर तो देशाच्या कानाकोपऱ्यात व्यापतो.
अरबी सुमद्रातून पुढे सरकून मान्सून केरळच्या दिशेने आगेकूच करतो. यंदा मान्सून दरवर्षीच्या तुलनेत उशिराने दाखल झाला आहे.
एल निनो या महाभयंकर वादळामुळे यंदा मान्सून दाखल होण्यास उशीर झाला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर दाखल होतो.
मान्सून सर्वात शेवटी जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राजस्थानचा पश्चिम भाग आणि पंजाबमध्ये दाखल होतो.
मे-जूनमध्ये राजस्थानचे वाळवंट प्रचंड तापते, त्यामुळे तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते.
पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील मान्सून वारे एकत्र आल्यानंतरच पंजाब आणि पश्चिम राजस्थानमध्ये पावसाची खरी सुरुवात होते.