BE पदवी, खासगी अनुभव... तरीही महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्याची नोकरी; कारण काय?

From Engineer To Sanitation Worker: नागपूर मनपाच्या भरतीत बीई शिक्षण घेतलेल्या तरुणाने खासगी नोकरीतील असुरक्षिततेमुळे सफाई कर्मचाऱ्याची नोकरी स्वीकारली. सरकारी नोकरीची स्थिरता आणि भविष्यातील संधीमुळे घेतलेला हा निर्णय चर्चेत.
BE GRADUATE JOINS SANITATION JOB IN NAGPUR MUNICIPAL CORPORATION FOR JOB SECURITY
BE GRADUATE JOINS SANITATION JOB IN NAGPUR MUNICIPAL CORPORATION FOR JOB SECURITYsaam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे. मनपामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली असून 103 उमेदवारांची सरळसेवेत नियुक्ती करण्यात आली, तर तब्बल 476 सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या भरतीदरम्यान एक वेगळी आणि विचार करायला लावणारी गोष्ट समोर आली आहे. BE शिक्षण पूर्ण केलेल्या शुभम बावनकर या तरुणाने तरुणाने खासगी क्षेत्रात सात-आठ वर्षे काम केल्यानंतरही नोकरीतील असुरक्षिततेमुळे अखेर मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीतील स्थिरता आणि भविष्यातील पदोन्नतीची संधी यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

BE GRADUATE JOINS SANITATION JOB IN NAGPUR MUNICIPAL CORPORATION FOR JOB SECURITY
अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांची बस उलटली; अधिवेशन आटोपून परतताना घडला अनर्थ

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आणि आस्थापना खर्चाचा ताण असतानाही ही भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य काम देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर नीता ठाकरे यांनीही या भरतीबाबत समाधान व्यक्त केले असून, शहराच्या स्वच्छतेसह प्रशासन अधिक सक्षम होण्यास याचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले.

BE GRADUATE JOINS SANITATION JOB IN NAGPUR MUNICIPAL CORPORATION FOR JOB SECURITY
सोलापूर हादरले! रेल्वेखाली झोकून देत आई-मुलीने संपवलं जीवन

अभियंता असूनही सफाई कर्मचाऱ्याची नोकरी स्वीकारावी लागणं, हे एका बाजूला सरकारी नोकरीचं वाढतं आकर्षण दर्शवतं, तर दुसऱ्या बाजूला खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या अस्थिरतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com