अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांची बस उलटली; अधिवेशन आटोपून परतताना घडला अनर्थ

Amravati Teachers Bus Accident : शेगाव येथील एका अधिवेशनावरून परतत असताना अमरावती जिल्ह्यातील अकोट-अंजनगाव मार्गावर शिक्षकांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात १६ शिक्षक जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Amravati Teachers Bus  Accident
Major Accident in Amravati: Teachers Injured as Bus Capsizes After Shegaon Eventsaam tv
Published On
Summary
  • अकोट अंजनगाव मार्गावर शिक्षकांच्या बसचा अपघात

  • शेगाव अधिवेशनावरून परतताना बस उलटली

  • अमरावतीतील शिक्षक बस दुर्घटनेत १६ जखमी

अमरावती जिल्ह्यातील अकोट-अंजनगाव मार्गावर भीषण अपघात झाला आहे. शिक्षकांच्या बस उलटून अपघात झालाय. शेगाववरून शिक्षक अधिवेशन आटोपून परतताना बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत १६ शिक्षक जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बस चालकाने गतिरोधकावर चालकाने जोरात ब्रेक लावला. त्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटला आणि बस उलटली.

Amravati Teachers Bus  Accident
महामार्गावर भीषण अपघात! दोन बस समोरासमोर धडकल्या; ३५ जणांचा मृत्यू

. या दुर्घटनेत १६ शिक्षक जखमी झाले असून त्यांना जखमींना अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी शिक्षकाला पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

Amravati Teachers Bus  Accident
Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; शिक्षक गंभीर जखमी

चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. आयशर टेम्पोने होंडा ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. शंकर पाटील (रा. सावर्डा भुवडवाडी) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी टेम्पोच्या पुढील चाकाखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये हे प्राथमिक शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि सावर्डे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com