फुटीर खासदारांच्या दारात उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, फुटीरांना सक्षम पर्याय देण्यात यश मिळणार?

Uddhav Thackeray Marathwada Tour Schedule 2026: सहा खासदार फुटल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माणासाठी उद्धव ठाकरे फुटीरांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. ठाकरेंचे मिशन मराठवाडा यशस्वी होणार का? फुटीर खासदारांविरोधात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा काय प्लॅन आहे? पाहूया या रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray addresses party workers during his Mission Marathwada tour targeting rebel MPs’ constituencies.
Uddhav Thackeray addresses party workers during his Mission Marathwada tour targeting rebel MPs’ constituencies.saam tv
Published On

फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ठाकरेसेनेच्या खासदारांच्या पाठोपाठ आमदारही फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांशी संवाद साधल्यानंतर आता बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. यानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचं आता मिशन मराठवाडा सुरू केलंय. फुटीरांच्या मतदारसंघात त्यांचा दौरा कसा असणार ते पाहूयात..

फुटीरांच्या दारात उद्धव ठाकरे?

27 जून

यवतमाळ

संजय देशमुख

खासदार, शिंदेसना

कार्यकर्ता मेळावा

सकाळी 10.30 वा.

वाशीम

कार्यकर्ता मेळावा

दुपारी 2 वा.

--------------------------

27 जून

हिंगोली

नागेश पाटील-आष्टीकर

खासदार, शिंदेसना

कार्यकर्ता मेळावा

सायंकाळी 5 वाजता

.....................................

28 जून

परभणी

संजय जाधव

खासदार, शिंदेसना

कार्यकर्ता मेळावा

सकाळी 10 वा.

--------------------

28 जून

धाराशिव

ओमराजे निंबाळकर

खासदार, शिंदेसना

कार्यकर्ता मेळावा

दुपारी 4 वा.

........................................

29 जून

शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे

खासदार, शिंदेसना

कार्यकर्ता मेळावा

दु. 12 वाजता

सहा खासदार फुटल्यानंतर ठाकरेसेनेचं पहिलं आंदोलन वाशिममध्ये झाले होतं. उद्धव ठाकरेंच्या दौ-यानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात आहेत. त्यांच्या काय भावना आहेत पाहूयात..उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत.

एकेकेकाळी मराठवाडा हा ठाकरेंचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना अपयश आलं. त्यात लोकसभेत निवडून आलेले सर्व चारही खासदार आता शिंदेसेनेत गेले. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्य़ासह ठाकरेंसमोर या फुटीर खासदारांना पर्याय उभं करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे आता या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com