सोलापूर हादरले! रेल्वेखाली झोकून देत आई-मुलीने संपवलं जीवन

Solapur Mother Daughter End Life Railway Tracks: सोलापूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून आई आणि १४ वर्षीय मुलीने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. विजापूर रोड परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून तपास सुरू.
Solapur tragedy Mother and 14-year-old daughter die after jumping before a moving train near Vijapur Road.
Solapur tragedy Mother and 14-year-old daughter die after jumping before a moving train near Vijapur Road.saam tv
Published On

सोलापूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. विजापूर रोड परिसरातील रेल्वे रुळावर आई आणि मुलीने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण सुशील नगर परिसरात तीव्र हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

Solapur tragedy Mother and 14-year-old daughter die after jumping before a moving train near Vijapur Road.
फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर...; नरेंद्रचार्य महाराजांचे मोठं विधान

वर्षा आढतराव (वय ३३ वर्षे) आणि स्वरा आढतराव (वय १४ वर्षे) अशी मृत आई आणि मुलीची नावे आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघींनी विजापूर रोड परिसरातील रेल्वे रुळावर जाऊन हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.

Solapur tragedy Mother and 14-year-old daughter die after jumping before a moving train near Vijapur Road.
NEET मध्ये फक्त 11 गुणांनी हुकली सीट; अहिल्यानगरमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

आई-मुलीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण की अन्य काही कारण? या सर्व शक्यतेच्या अंगाने रेल्वे पोलीस सध्या कसून तपास करत आहेत. प्राथमिक तपासाअंती आणि नातेवाइकांची चौकशी झाल्यानंतरच या आत्महत्येमागील खरे कारण स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com