Indian Railways Tickets : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता 'या' तिकीटावर मिळणार ३% सूट

RailOne App News : भारतीय रेल्वेने RailOne App वरून जनरल तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ३ टक्के सूट जाहीर केली आहे. डिजिटल पेमेंटच्या मदतीने तिकीट बुक केल्यावर वेळ, पैसा आणि स्टेशनवरच्या रांगांचा त्रास वाचणार आहे.
Indian Railways 3% Discount
Indian Railways 3% Discountgoogle
Published On

रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नेहमी जनरल तिकीट घेऊन रेल्वेन प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. भारतीय रेल्वेने RailOne App मध्ये जनरल तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला.तर हा ३१ मार्च २०२७ पासून सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे.

रेल्वेने ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने तिकीट बुक करावं आणि रेल्वे स्थानकावरच्या लांबच्या लांब रांगा टाळाव्या यासाठी हा निर्णय घेतला आहे.

Indian Railways 3% Discount
8th Pay Commission: पगार, DA, HRA आणि पेन्शनवर होणार मोठा परिणाम, पाहा 2.1, 2.5 आणि 3.0 फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित

ऑनलाइन तिकीट बुकींगवर मिळणार ३ टक्के सूट

RailOne App वरून जनरल तिकीट बूक केल्यावर तिकीटाच्या किमतीवर ३ टक्के सवलत मिळणार आहे. ही सूट मिळवण्यासाठी तिकीटाचं पेमेंट UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग अशा डिजिटल माध्यमातून करावं लागेल. तिकीट बूक करतानाच ही सूट तुम्हाला आपोआप लागू होईल.

स्टेशनवरच्या रांगांपासून सुटका होणार

जनरल तिकीट घेण्यासाठी बऱ्याचदा प्रवाशांना स्टेशनवरच्या तिकीट खिडकीवर मोठ्या रांगेत उभं राहावं लागतं. पण आता RailOne App च्या मदतीने घरबसल्या किंवा स्टेशनवर पोहोचण्याआधीच मोबाईलवरून तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे वेळ वाचतो आणि तिकीट मिळण्याची प्रोसेस जास्त सोपी असेल.

डिजिटल तिकीटाचा आणखी एक फायदा

RailOne App वरून बुक केलेलं तिकीट डिजिटल पद्धतीने मिळतं. त्यामुळे तिकीटाची प्रिंट काढण्याची गरज नाही. प्रवासाच्यावेळी तिकीट तपासणीसाठी मोबाईलमध्ये असलेलं डिजिटल तिकीट दाखवता येतं. रेल्वेने ही ३ टक्के सवलतीची योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे जे प्रवासी सतत जनरल तिकीटावर प्रवास करतात, त्यांनी RailOne App चा वापर करून ऑनलाइन तिकीट बुक केल्याने वेळ आणि पैशांची बचत होईल.

Indian Railways 3% Discount
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com