

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून नवनवीन योजना राबवत असतं. त्यातलीच प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना. आत्तापर्यंत या योजनेचे २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर २४ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
सरकारने पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात २० जून रोजी जमा केला होता. या हप्त्यात २ हजार रुपयांचा निधी जमा झाला होता. पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपयांची मदत केली जाते. तर वर्षाला ३ हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. तर तुम्हाला २४ व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिला खात्यात पाठवला जातो. २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी पाठवला होता. तर २४ वा हप्ता हा ऑक्टोबर २०२६ मध्ये पाठवला जाण्याची शक्यता आहे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. तर २० तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांचे नियम पाळणं गरजेचं आहे. त्यासाठी आधार सीडिंग, जमीनीची कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला २४ व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२९ नंतर शेतजमिनिचा मालकी हक्क मिळवला आहे. जर एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेतला आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.