

बारामतीत पुन्हा विमान अपघात
बारामतीजवळ शेतात शिकाऊ विमान कोसळले
अपघातानंतरचा थरारक व्हिडीओ समोर
अपघातामध्ये कोणतिही जिवितहानी नाही
बारामतीमध्ये विमान अपघाताची मालिका सुरूच आहे. बारामतीजवळ पुन्हा एकदा विमान कोसळलं. एका शेतामध्ये शिकाऊ विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या विमान अपघातामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडी येथील विमानतळाजवळच ही घटना घडली. बारामतीमधील विमान प्रशिक्षण केंद्रातील हे विमान असल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये पायलट किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गेली अनेक वर्षांपासून याठिकाणी हे प्रशिक्षण केंद्र असून येथील शिकाऊ विमानाचे अनेक अपघात झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी अशाच एका विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर आजही या प्रशिक्षण केंद्रातील विमानाचा अपघात झाला.
बारामतीमधील विमानतळ परिसरात शिकाऊ विमान लँडिंग करताना खाली कोसळलं. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांच्या आसपास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. हा विमान अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही. या अपघातानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघाताचा तपास केला जाणार आहे.
बारामती विमानतळ परिसरामध्ये वैमानिकांना प्रशिक्षण देण्याच्या दोन संस्था कार्यान्वित आहेत. यापूर्वी देखील या शिकाऊ विमानांचे अपघात या परिसरात झालेले आहेत. आज पुन्हा एकदा विमानतळ परिसरामध्येच कॅम्पसमध्ये शिकाऊ विमानाचा हा अपघात झाला. यापूर्वी देखील बारामती परिसरात १३ मे २०२६ रोजी शिकाऊ विमान कोसळलं होतं. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात म्हणजे तीन महिन्यानंतर दुसरी दुर्घटना घडली आहे. आजच्या दुर्घटनेमध्ये हे शिकाऊ विमान हे कॅम्पस मध्येच धावपट्टीच्या बाजूला कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.