उत्तरप्रदेशमधील कासंगज जिल्ह्यात सोमवारी एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट अचानक बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. हा अपघात कासंगजमधील क्यामपुर बहेडीया भडरिया परिसरात घडला आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी घटनास्थळी जमा झाली.
या विमानात एक महिला प्रशिक्षणार्थी पायलट होती. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस आणि प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमी पायलटला प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ तात्काळ बंदोबस्तात घेतले आहे. क्रॅश झालेलं विमान पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेची माहिती संबंधित विमानन अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
सध्या या अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही. तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली याची चौकशी सुरू आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हे विमान बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. आसपासच्या नागरिकांना किंवा वाहनांना कोणतीही मोठी हानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा विमानन सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नुकतीच महाराष्ट्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता उत्तर प्रदेशात ट्रेनिंग एअरक्राफ्ट कोसळल्याने विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.