Bus Accident : पुण्यात भीषण अपघात! PMPML बसच्या धडकेत २ महिलांचा मृत्यू

Pune PMPML Bus Accident News : पुण्यात शुक्रवारी PMPML बसच्या धडकेत दोन महिलांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला. चांदणीनगरमध्ये हिट अँड रनचा तपास सुरू असून, बोपोडीतील अपघातात बसचालकावर कारवाई.
Pune PMPML Bus Accidents: Two Women Killed in Separate Crashes
Pune PMPML Bus Accidents: Two Women Killed in Separate CrashesAI Image
Published On
Summary
  • पुण्यात शुक्रवारी PMPML बसच्या धडकेत दोन महिलांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू

  • चांदणीनगर येथे PMPML बसने स्कूटरला धडक दिल्याने ५४ वर्षीय सुनीता काटे यांचा मृत्यू

  • बोपोडी-खडकी मार्गावर PMPML बसच्या धडकेत ५७ वर्षीय निर्मला नरेश पिल्लई यांचा मृत्यू

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरात शुक्रवारी PMPML बसच्या धडकेत दोन महिलांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला. सकाळी चांदणीनगर येथे पुणे-नगर महामार्गावर स्कूटरला PMPML बसने धडक दिल्याने सुनीता काटे (वय ५४, रा. आकुर्डी) यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा जखमी झाला असून, बसचालक घटनास्थळावरून बस घेऊन पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता काटे या शुक्रवारी सकाळी मुलासोबत स्कूटरवरून पुण्याहून वाघोलीच्या दिशेने जात होत्या. चांदणीनगर परिसरात त्यांच्या स्कूटरला PMPML बसने धडक दिली. या अपघातात काटे गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर मुलावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काटे यांचे भाऊ सुनील नागवडे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा हिट अँड रनचा प्रकार असल्याने पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. बसचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Pune PMPML Bus Accidents: Two Women Killed in Separate Crashes
Back Pain : रात्री अंथरुणावर झोपल्यावर पाठदुखी होते? 'या' आजरांची असू शकतात गंभीर लक्षणे

दरम्यान, शुक्रवारी दुपारी पुणे-मुंबई मार्गावर आणखी एका अपघातात निर्मला नरेश पिल्लई (वय ५७, रा. बोपोडी) यांचा PMPML बसच्या धडकेत मृत्यू झाला. पिल्लई या बोपोडीहून खडकीच्या दिशेने पायी जात असताना बसने त्यांना धडक दिली.

Pune PMPML Bus Accidents: Two Women Killed in Separate Crashes
Bribe Case : कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB ची मोठी कारवाई!

या प्रकरणी खडकी पोलिसांनी २२ वर्षीय PMPML बसचालकाला अटक केली होती. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडण्यात आले. पिल्लई यांच्या मुलगी प्रीती मूर्ती (३२, रा. बोपोडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शहरात एकाच दिवशी PMPML बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com