Alisha Khedekar
हाडांची हाड ठिसूळ झाल्यास किरकोळ दुखापतीनंतरही मणक्यांना इजा होऊन सतत पाठदुखी होऊ शकते.
व्यायाम, जड काम किंवा अचानक हालचालींमुळे स्नायूंवर ताण येतो आणि झोपताना पाठ दुखू शकते.
मणक्यांमधील डिस्कवर दबाव आल्यास पाठदुखीसोबत पायात मुंग्या, झिणझिण्या किंवा वेदना जाणवू शकतात.
कंबरेपासून नितंब आणि पायापर्यंत जाणारी तीव्र वेदना सायाटिकाचे संभाव्य लक्षण असू शकते.
वयानुसार मणक्यांमध्ये होणाऱ्या झिजेमुळे रात्री किंवा बराच वेळ झोपल्यानंतर पाठदुखी जाणवू शकते.
पाठदुखीसोबत लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी किंवा ताप असल्यास मूत्रपिंडाशी संबंधित कारण तपासावे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा