Alisha Khedekar
ताजे, स्वच्छ कढीपत्त्याची पाने घ्या आणि पाण्याने धुवून पूर्णपणे कोरडी करा.
कोरडी पाने हाताने किंवा मिक्सरमध्ये थोडी बारीक करा, त्यामुळे त्यातील घटक तेलात सहज मिसळतात.
नारळाचे तेल बेस म्हणून घ्या. ते केसांना मॉइश्चर देण्यासाठी आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मंद आचेवर नारळाच तेल गरम करून त्यात कढीपत्ता घाला आणि काही मिनिटे हलके गरम करा.
गॅस बंद केल्यानंतर तेल पूर्णपणे थंड होऊ द्या, नंतर बोटांनी तेल टाळूवर हलक्या हाताने लावा आणि काही मिनिटे मसाज करा.
तेल लावल्यानंतर साधारण तीस मिनिटे ते एक तास ठेवून सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा