Baramati Plane Crash: बारामती विमान अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Baramati Plane Crash Video: बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळल्याची घटना घडली. बारामतीच्या गोजू बावी या गावाजवळ हे विमान कोसळलं. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

पुण्यातील बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळल्याची घटना घडली. या विमान अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. बारामतीमधील गोजू बावी या गावाजवळ हे विमान आज सकाळी कोसळलं. सुदैवाने या अपघातामध्ये कुणी जखमी झाले नाही आणि जीवितहानी देखील झाली नाही. हे विमान पडतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान ज्या ठिकाणी कोसळले होते त्याच ठिकाणी आज विमान कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या विमानात एकच पायलट होता. या अपघातामध्ये हा पायलट सुरक्षित आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे. हे विमान शिकाऊ होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com