Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार, अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू असून अजित पवार गटातील १५ ते २० आमदारांनी शरद पवारांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीपूर्वी राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार,  अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात
Maharashtra Political NewsSaam Tv
Published On
Summary
  • अजित पवार गटातील १५ ते २० आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

  • बारामती पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग

  • पक्षातील अंतर्गत वादामुळे आमदार अस्वस्थ

  • राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

राज्यात अनेक दिवसांपासून दोन राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा सुरु आहे. मात्र अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता बारामती पोट निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान हे आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार का? या चर्चांना आता उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी विरोध केला, मात्र असं असतानाच अजित पवार गटाच्या एका मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार गटातील १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान या भेटीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार,  अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात
Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

टीव्ही ९च्या वृत्तानुसार, पक्षातील सतत होणाऱ्या वादामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. तसेच या आमदारांना भविष्यातील आपल्या राजकारणातील भवितव्याबाबत चिंता भेडसावत आहे. मतदारसंघात अंतर्गत वादामुळे जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती आमदारांकडून व्यक्त केली जात आहे.

Political News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप होणार,  अजित पवार गटाचे १५ ते २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात
Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

त्यामुळे काही आमदार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असून शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता हे आमदार अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com