कल्याण-शहाड पुलावर भीषण अपघात
डॉक्टर सोमनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू
आयशर टेम्पो चालक अटकेत
न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan Shahad Bridge Accident Doctor Death कल्याण आणि शहाडला जोडणाऱ्या पुलावर आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर यांचे नाव सोमनाथ पाटील असे आहे. डॉक्टर पाटील हे आपल्या दुचाकीने रात्री उशिरा कल्याण आणि शहाडला जोडणाऱ्या पुलावरून प्रवास करत होते. यादरम्यान एका आयशर टेम्पोने डॉक्टर पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, डॉक्टर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपस्थित जमावापैकी काहींनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले. या प्रकरणी टेम्पो चालक बॉबी चंदन जुनी याला अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.