Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली

Pune News : पुण्यातील मंचरमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेने १४ वर्षीय मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि ६ वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून आई व मुलगी जखमी आहेत.
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली
Pune NewsSaam tv
Published On
Summary
  • मंचरमध्ये कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना

  • आईने मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला

  • ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • आई आणि मुलगी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

रोहिदास घाडगे, पुणे

पुण्यातील मंचरमध्ये एका महिलेने धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाली असं समजून तिने सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. या दुर्घटनेत १४ वर्षीय मुलगी आणि सदर महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सहा वर्षांच्या निर्दयी मुलाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे कौटुंबिक वादातून महिलेने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुण्यातील मंचर येथील आंबेगावमध्ये घडली आहे. नेहाल आशिष बाणखेले असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर या दुर्घटनेत परिज्ञा बाणखेले ही मुलगी आणि हर्षदा बाणखेले ही महिला गंभीर जखमी झाले आहेत. या दोघींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली
Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

आज म्हणजेच शुक्रवार ३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हर्षदा बाणखेले या महिलेने आपल्या पोटच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न केला. मुलगी बेशुद्ध झाल्याचं बघून महिलेने स्वतःच्या ६ वर्षीय मुलासोबत तपनेश्वर स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत उडी मारली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, आधी पोटच्या मुलीचा गळा दाबला, नंतर ६ वर्षांच्या मुलाला घेऊन विहिरीत उडी मारली
Pune : पुण्यात मोठी दुर्घटना! रिंग रोडच्या कामावेळी ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू; कामगारामध्ये संतापाची लाट

विहिरीतून मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यावेळी महिला व मुलगा पाण्यावर तरंगताना दिसले. उपस्थित नागरिकांपैकी काहींनी विहिरीत उतरून दोघांना बाहेर काढले. या दुर्घटनेत महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाले, तर महिलेच्या ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.प्राथमिक माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून सदर महिला स्वतंत्र राहत होती. तिने कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com