Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

Rajasthan Bharatpur News : राजस्थानातील भरतपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. उकळत्या दुधात पडून १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू
Rajasthan Bharatpur 10 Month Old Girl Chandani DiesSaam tv
Published On
Summary
  • भरतपूरमध्ये १० महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

  • उकळत्या दुधात पडून गंभीर भाजल्यामुळे मृत्यू

  • घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला

Rajasthan Bharatpur 10 Month Old Girl Chandani Dies राजस्थानमधील भरतपूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भरतपूरच्या नादबाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उकळत्या दुधात पडून एका १० महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा मृत मुलीची आई घरीच होती. चिमुकलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भरतपूरमधील नादबाई येथील बेहरामदा गावात घडली. या गावात राहणारे सत्यभान हे सकाळच्या सुमारास कामावर गेले होते, तर त्यांची पत्नी प्रीती आणि त्यांची १० महिन्यांची मुलगी चांदणी घरी होत्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्रीतीने दूध उकळून ते थंड होण्यासाठी खोलीतील पलंगाजवळ ठेवले. या वेळेस पलंगावर चांदणी तिच्या खेळण्यांसोबत खेळत होती.

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू
Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! आता दिवा स्थानकातून सुटणार पॅसेंजर; वाचा सविस्तर

खेळता खेळता चांदणीचा तोल जाऊन ती पलंगाशेजारी ठेवलेल्या उकळत्या दुधाच्या टोपात पडली. गरम दुधात पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. चांदणीच्या रडण्याने तिची आई धावत तिच्याजवळ आली. त्यावेळेस चिमुकली गंभीररीत्या भाजलेली होती.

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू
Pune : पुण्यात मोठी दुर्घटना! रिंग रोडच्या कामावेळी ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू; कामगारामध्ये संतापाची लाट

कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या नादबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तिला भरतपूर येथील आरबीएम रुग्णालयात पाठवले, जिथे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. दरम्यान मुलीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com