Ashok Kharat: भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती, भोंदू खरातचा अनोखा कारनामा; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था पोलिसांच्या रडारवर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातने भक्तांच्या आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर करून १०० हून अधिक बोगस खाती उघडल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Case:
Ashok Kharat’s scam deepens as 100 bogus accounts linked to devotees come under investigation.saam tv
Published On

भोंदूबाबा अशोक खरात याचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. अंकशास्त्राच्या आधारे लोकांचं भविष्य सांगणाऱ्या खरातनं अनेक महिलाचं शोषण केलं. अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या वाटेवर आहेत. आता ढोंगी खरातचा नवा कारनामा समोर आला आहे. खरातने भक्तांची फसवणूक तर केलीच शिवाय भक्तांच्या आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर केला. त्या दोन्ही कार्डच्या आधारे त्याने चक्क पतसंस्थांमध्ये बोगस खाती उघडली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case:
Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

समता आणि जयदंबा माता पतसंस्थांमध्ये खरातने ही खाती उघडली आहेत. या खळबळजनक खुलाशानंतर समता आणि जयदंबा माता या दोन्ही पतसंस्था पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. अशोक खरातने बहुतेक भक्तांना आपल्या विश्वासात घेऊन त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा केली होती. या कागदपत्रांचा वापर करून त्याने 'समता पतसंस्थेत' तब्बल १०० हून अधिक बोगस खाती उघडली.

Ashok Kharat Case:
खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

विशेष म्हणजे या सर्व खात्यांवर वारसदार म्हणून स्वतः अशोक खरातचेच नाव लावण्यात आले आहे. हा सर्व प्रकार काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आला असा संशय पोलिसांना आहे. खरातच्या या मायाजालात सामान्य भक्तांप्रमाणे तर काही मोठे लोकही अडकल्याचे दिसत आहे. राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्या नावे देखील समता पतसंस्थेत खाती उघडण्यात आली आहेत.

Ashok Kharat Case:
भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

नामकरण आवारे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची मिळून तब्बल सहा खाती याच पतसंस्थेत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. दरम्यान आवारे यांच्या खात्यांतून नेमके कसले व्यवहार झाले आणि खरातशी त्यांचे आर्थिक संबंध काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या चौकशीतून आणखी अनेक भक्तांची नावे आणि बोगस खाती समोर येतील अशी शक्यता वर्तवली जात आहेत.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील या २ पतसंस्थांमध्ये खरातने खाती उघडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते उघडण्यात आले आहे. या खात्यांमार्फत अशोक खरातने १०० कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. अशोक खरात स्वत:च ही सगळी खातं हाताळत होता. त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक आहे. या प्रकरणी आता दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com