

भोंदू अशोक खरात याच्याविरोधातील तपासात मोठी बाब समोर आली आहे. विशेष तपास पथकाकडून गेल्या पाच तासापासून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती उघड होत आहे. प्राथमिक तपासात खरात चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याची बाब समोर आली आहे. यापैकी एक क्रमांक हा केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी, दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरायचा.
तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित कामांसाठी वापरला जायचा, तर चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरायचा अशी धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने सर्व मोबाईल फोन आणि संबंधित क्रमांकांचा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम हाती घेतले आहे. यातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकारी म्हणालेत.
एसआयटी पथकाकडून प्रत्येक दिवशी अशोक खरातची कसून चौकशी केली जातेय. आज सलग 13 व्या दिवशीही खरातची चौकशी सुरू आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. यानंतर त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्यापर्यंत पोलीस पुरावे गोळा करत आहे, आणि अधिक माहिती जाणून घेत आहेत. दरम्यान अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध वापरत असावा, असा संशय पोलिसांना आहे.
या संशयामुळे खरात प्रकरणात पोलिसांकडून नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. नाशिकमधील काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने खरात काही गोळ्या औषध देत होता का, याचा तपास केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.