

आतापर्यंत आठ लैंगिक शोषणाचे तर दोन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
एसआयटीन डिजिटल पंचनामा पूर्ण केला.
ओकस प्रॉपर्टी कार्यालयामध्ये एसआयटीकडून झाडाझडती घेण्यात आली.
भोंदू बाबा अशोक खरातच्या ऑफिसमधून एसआयटीन आता महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयाची एसआयटी आणि फॉरेन्सिककडून झाडाझडती घेण्यात आली. अशोक खरातने याच कार्यालयात 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. खरातने पीडित महिलांचे कुठे लैंगिक शोषण केले. याबाबतची माहिती देखील एसआयटीकडून जाणून घेण्यात आली. खरातच्या कार्यालयातील आजचा एसआयटीचा तपास पूर्ण झाला आहे.
एसआयटीनं या ठिकाणी येऊन डिजिटल पंचनामा पूर्ण केला आहे. पीडित महिलेला घेऊन एसआयटीन ऑफिसमध्ये लाईव्ह स्क्रीनिंगही केलं. खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची यामुळे शक्यता आहे. आतापर्यंत आठ लैंगिक शोषणाचे तर दोन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
फिर्यादींना घेऊन एसआयटीच्या टीमने खरातच्या ऑफिसची झाडझडती घेतली. उद्या खरातच्या पोलीस कोठडीचा अखेरचा दिवस असणार आहे त्यामुळे एसआयटीकडून तपासाला आता वेग देण्यात आला आहे. उद्या खरंतर एक एप्रिलपर्यंत अशोक खरात याची पोलीस कोठडी आहे, त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये जास्तीत पुरावे शोधण्याचा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येत आहे.
अशोक खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह आहेत. यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे. अशोक खरातचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
तर अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे. खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आलेत. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली आहे. अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. अशोक खरात प्रकरणी तपासात विविध माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.