

खरातच्या मोबाईलमध्ये नेत्यांची नावे सापडल्याचा दावा
पेन ड्राईव्हमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता
न्यायालयाकडून पोलीस कोठडी वाढवली
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. खरातच्या दरबारी ३९ आमदार रांगा लावत असल्याचा खुलासा चक्क दिपक केसरकर यांनी केला आहे. त्याचदरम्यान तपास करणाऱ्या विशेष पथकाला खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांनी नावे सापडली आहेत. अशोक खरात प्रकरणाचा पेन ड्राइव्ह उघड झाला तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसेन. सरकार अडचणीत येईल , असा दावा काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
भोंदूबाबा अशोक खरातला रविवारी नाशिकमधील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने खरातला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरातचा मुक्काम १ एप्रिलपर्यंत तुरुंगातच असणार आहे. दरम्यान या सुनावणीत सरकारी वकिलांनी एक महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली.
अशोक खरात चौकशीत पोलिसांना सहकार्य करत नाही. महिलांच्या अत्याचाराचा विषय निघताच तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे तपास अपूर्ण असल्यानं तो पूर्ण करण्यासाठी खरातची पोलीस कोठडी वाढवून हवी. तसेच खरात याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमकडून सुरुय.
आम्ही या मोबाईल डेटाची क्लोन कॉपी घेतली आहे. या मोबाईलमध्ये काही राजकीय नेत्यांचे नंबर डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे. या सगळ्याबाबत माहिती मिळवण्यासाठी खरातची पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, असं सरकारी वकिलांनी सांगितले.
दीपक केसरकर यांनी त्या ३९ आमदारांची यादी जाहीर करावी. यासंदर्भात पेन ड्राइव्ह बाहेर झाला तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसेन. त्यामुळे सरकार अडचणीत येईल, असा दावा काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
दमरम्यान लहान मुलीच्या शोषणाच्या प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. कारण मोठ्या लोकांना वाचवायचे होते. आता खरात यांच्याबाबत काहीही घडू शकते, आणि अनेक पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. अमावस्येच्या दिवशी मोठे नेते अंधारात आपली पापे लपवण्यासाठीच जात असावेत. अशा भेटींची चौकशी झाली पाहिजे, असेही विजय वडेवट्टीवार म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.