Ashok Kharat: नवऱ्याबरोबर वाद झाला, सूख शांतीसाठी खरातकडे गेली; शुद्धीच्या नावाने ऑफिसमध्येच नको ते केलं, नवा कारनामा आला समोर

Ashok Kharat: भोंदुबाबा खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून त्याने ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.
Ashok Kharat:
Ashok Kharat case widens as another woman files complaint alleging exploitation under the guise of spiritual guidance.saam tv
Published On
Summary
  • अशोक खरातविरोधात नवीन गुन्हा दाखल

  • ३८ वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला

  • हॉट आणि कोल्ड रिडिंग तंत्र वापरून महिलांना जाळ्यात अडकवले

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत,दररोज नवीन एक गु्न्हा दाखल केला जात आहे. आता या भोंदूबाबा खरातविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असून आतापर्यत अशोक खरातविरुद्धा १० गु्न्हे दाखल करण्यात आली आहेत. नव्या दाखल झालेल्या नव्या गुन्हात खरातनं एका ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat:
महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

भोंदू बाबा अशोक खरातने तंत्र मंत्राच्या नावाने अनेक महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवले आहे. महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हॉट रिडींग आणि कोल्ड रिडींगसारख्या मानसशास्त्रीय ट्रिक वापरायचा. महिला पहिल्यांदा भेटीला गेली की तो सुरुवातीच्या पाच मिनिटातच समोरच्याला आयुष्याचा आरसा दाखवायचा आणि त्याचा विश्वास जिंकायचा. त्यानंतर त्या महिलेशी लगटपणा करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. अशीच एक नवं प्रकरण आता नव्याने दाखल झालेल्य गुन्ह्यात उघड झाले आहे.

Ashok Kharat:
'शुद्धीकरण तर कोणाला लग्नाचं आमिष'; अशोक खरात लैंगिक अत्याचारासाठी वापरायचा वेगवेगळ्या क्लृप्त्या; ५ वा गुन्हा दाखल

खरातचा आणखी एक कारनामा

अशोक खरातने ३८ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचं उघड झाले आहे. पीडित महिलेचे कौटुंबिक वाद होते. आपला संसार सुरळीत चालावा म्हणून तिचा पती तिला खरातकडे घेऊन गेला. त्यावेळी खरातने नवरा बायकोमध्ये भांडण होऊ नये म्हणून काही उपाय सांगितले. यात अशोक खरातने पतीला बाहेर थांबण्यास सांगितलं आणि त्याच्या पत्नीला ऑफिसमध्ये बोलवलं. मन आणि शरीरशुद्धी करण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केले. तब्बल चारवेळा त्याने त्या महिलेवर अत्याचार केलेत.

दरम्यान खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना गंडा घालण्यासाठी हॉट रिडींग आणि कोल्ड रिडींग पध्दत वापरायचा. हॉट रिडींग ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. हीच संकल्पना वापरुन खरातने दोन टीम तयार केल्या होत्या. त्यातील एक टीम समोरच्या व्यक्तीची भक्ताच्या नातेवाईकाकडून, सोशल मीडियावरुन खासगी माहिती गोळा करायची.

याच माहितीच्या आधारे पहिल्या 5 मिनिटात भूतकाळातील गोष्टी सांगून त्यांचे भविष्य सांगून महिलांचा विश्वास जिंकायचा. तर कोल्ड रिडींग करताना पहिले काही प्रश्न विचारुन समोरच्याच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज घेत असायचा. समोरच्या व्यक्तीचं फेस रीडिंग, हावभाव, शारीरिक हालचाल, पेहराव, वय आणि संवादावरुन अंदाज घेत प्रश्न विचारत असायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com