धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

UP Crime News: कानपूरमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीमंत करण्याच्या नावाखाली एका महिलेला तिच्या कुटुंबीयांनी जादूटोणाच्या विधीसाठी तिला विवस्त्र केलं.
धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं
Published On

महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण खूप चर्चेत आहे. खरातनं तंत्रमंत्राच्या पूजेच्या नावावरून अनेक महिलांचं शोषण केले आहे. दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशाच्या कानपूरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. येथे करोडपती होण्यासाठी अंधश्रद्धा, मंत्रतंत्राच्या अधीन झालेल्या एका कुटुंबाने नवविवाहित सुनेसोबत घृणास्पद कृत्य केलं.

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं
भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

कानपूरमधील एका कुटुंबातील सासू-सासऱ्यांनी सुनेला विवस्त्र करत तिला संपूर्ण कुटुंबासोबत पूजेला बसवलं. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबियाच्या या कामात महिलेच्या पतीही साथ देत होता. जेव्हा या महिलेने याला विरोध केला. तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. माहेरहून कोट्यवधी रुपये आणि दागिने आणण्यासाठी दबाव आणला. त्याबरोबर आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत तक्रार न देण्यासाठी तिला धमकावले सुद्धा .

आता या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला आहे. कौतुक मिश्रा तिने लग्न केलं आहे. कौतुक मिश्राचे वडील विनित मिश्रा आणि आजोबा बब्बू मिश्रा हे कानपूरमधील एक प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक आहेत

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं
Ashok Kharat Case: मोबाईलमध्ये सापडली नेत्यांची नावं; पेन ड्राईव्ह बाहेर आला तर सरकार येणार गोत्यात? काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ

दरम्यान लग्नावेळी या तरुणीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना ५ कोटी रुपयांचा हुंडा दिला होता. मात्र लग्नानंतर या महिलेसोबत सासरवास होऊ लागला. या संदर्भात दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने सांगितले की, लग्नानंतर सासरी गेल्यावर एकेदिवशी रात्री १२ वाजता सासूने मंत्र तंत्राची पूजा केली. ही पूजा केल्यानेच आमच्या घरात समृद्धी आली. तसेच मलाही त्या पूजेमध्ये सहभागी व्हावं लागेल, असे सासूने सांगितले.

मात्र या पूजेसाठी घरातील सर्व जण विवस्त्र होऊन सहभागी होतात. त्यामुळे तुलाही आपले कपडे काढून या पूजेमध्ये सहभागी व्हावे लागेल. असेही सासूने सूनेला सांगितले. त्याला सूनेने विरोध केला. तेव्हा माझे पती आणि सासऱ्यांनी जबरदस्तीने माझे कपडे उतरवले. त्यानंतर माझ्या पतीने मला विवस्त्रावस्थेत एका खोलीत बंद केले. माझ्या शरीराला राख लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com