Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थेला पाणी देणारे मंत्री कोण? राजकीय दबाव टाकत पाणी ट्रस्टसाठी वळवलं

Nashik Ashok Kharat Case: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातच्या संस्थेला पाणी महाविकास आघाडीच्या काळात देण्यात आले होते. हे पाणी देणारे मंत्री कोण? याबाबत महत्वाची माहिती समोर आली.
Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थेला पाणी देणारे मंत्री कोण? राजकीय दबाव टाकत पाणी ट्रस्टसाठी वळवलं
Ashok Kharat Case Saam tv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर

  • खराच्या संस्थेला राजकीय दबावातून पाणी वळवण्याचा आरोप

  • ४० किमीची पाणी लाईन टाकून देण्यात आले होते पाणी

  • सरकारकडून चौकशीचे आदेश

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खराने राजकीय दबाव वापरून मिरगावच्या पाण्याची टाकी स्वत:च्या संस्थानासाठी वळवली आली होती. कॅप्टन अशोक खरातच्या संस्थानला पाणी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही मंत्र्यांनी आग्रह केला होता. हे मंत्री कोण होते याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अशोक खरातच्या संस्थेला ४० किमीपर्यंत पाण्याची लाईन देण्यासंदर्भात चौकशी करणार असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा अशोक खरातने ग्रामपंचायत निधीतून मंजूर झालेली पाणीपुरवठ्याची टाकी राजकीय दबावाचा वापर करत शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवण्यात आल्याचे समोर आलं आहे. दारणा धरणातून गोदावरी नदीत जे पाणी सोडले जाते त्यातूनच कॅप्टन अशोक खरातच्या संस्थानाला ३९ लाख लिटर पाणी देण्याचा शासन निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता.

Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थेला पाणी देणारे मंत्री कोण? राजकीय दबाव टाकत पाणी ट्रस्टसाठी वळवलं
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं

मिरगावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ही टाकी मंजूर करण्यात आली होती. मात्र कॅप्टन खरातने आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत ही टाकी देवस्थानासाठी पळवल्याचा आरोप होत आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता शिवनिका संस्थानच्या आवारातच ग्रामपंचायत विकास निधीतील पाण्याची टाकी उभारण्यात आल्याचे समोर आलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण मंत्री कॅप्टन खरातच्या संस्थानाला पाणी देण्यासाठी आग्रही होते, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील खरातच्या संस्थेला पाणी दिल्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थेला पाणी देणारे मंत्री कोण? राजकीय दबाव टाकत पाणी ट्रस्टसाठी वळवलं
Ashok Kharat Case : रूपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा 'सेक्स रॅकेट'चा आरोप, अटकेची केली मागणी

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावमधील ईशान्येश्वर मंदिरातील पुजाऱ्याची चौकशी होणार आहे. मिरगावच्या फॉर्म हाऊसवरील कामगारांची देखील चौकशी केली जाणार आहे. पुजारी आणि कामगारांच्या चौकशीतून फॉर्म हाउसवर काय कारनामे चालायचे याचा खुलासा होणार आहे. पुजारी, कामगार आणि अशोक खरातची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून अशोक खरातचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: अशोक खरातच्या संस्थेला पाणी देणारे मंत्री कोण? राजकीय दबाव टाकत पाणी ट्रस्टसाठी वळवलं
Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com