Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
CM Devendra FadnavisSaam Tv

Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

CM Devendra Fadnavis On Ashok Kharat Case: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
Published on

Summary -

  • खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

  • आम्हीच या प्रकरणाचा भांडाफोड केल्याचा फडणवीसांचा दावा

  • एसआयटीमार्फत तपास सुरू असल्याचे सांगितले

  • दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली

सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. खरात प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'खरात प्रकरणाचा आम्हीच भांडाफोड केला. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होत आहे. यामध्ये एसआयटी तयार केली आहे. नाशिक पोलिस आणि एसआयटी मिळून तपास करत आहेत. या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी समोर यावे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. या प्रकरणाविषयी सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

या प्रकरणावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, 'कोणकोण विरोधक तिकडे गेलेले मला माहिती आहे. खरातचे कुणासोबत संबंध याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. कुणाचा कुणासोबतही फोटो असू शकतो. खरातला कुणी भेटले म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. खरातच्या संस्थेला ४० किमीपर्यंत पाण्याची लाईन देण्यासंदर्भातही चौकशी होईल. आपल्या तथाकथीत शक्तींचा वापर करून महिलांना फसवणं योग्य नाही. त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल. ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून ४० किमी दूर पाणी दिले.'

Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं

तसंच, 'या प्रकरणात काहींना राजकारण करायचे आहे. पण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. ज्या महिलांसोबत त्याने दूरव्यवहार केला आहे त्यांना आम्हाला न्याय द्याययचा आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. या प्रकरणात पिडितांना धीर देऊन त्याच्या घरच्यांना धीर देऊन पुढे आणले जात आहे. खरातच्या संस्थेला पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची आहे पण पहिल्यांदा आम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे. खरात प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही.' , असे मुख्यमंत्री म्हणाले.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
Ashok Kharat Case : रूपाली चाकणकरांवर ठोंबरेंचा 'सेक्स रॅकेट'चा आरोप, अटकेची केली मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com