Nashik Ashok Kharat Rupali Chakankar Rupali Thombre Allegations : नाशिकच्या भोंदू बाबाचे धक्कादायक 'सेक्स रॅकेट' प्रकरण आता राजकीय वळण घेऊ लागले आहे. या प्रकरणावरून रूपाली ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. "हे संपूर्ण रॅकेट चाकणकर यांच्या पाठबळाशिवाय चालूच शकले नसते," असा खळबळजनक दावा करत ठोंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांना 'मुख्य सूत्रधार' म्हणून अटक करण्याची मागणी केली आहे. या रॅकेटमध्ये २५० हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर झाल्याचा आरोपही ठोंबरे यांनी केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या नाशिक मधील सेक्स रॅकेट प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. कायद्याला धरून करण्यात आलेली ही मागणी आहे आणि या प्रकरणात कलम १२० अंतर्गत त्या मुख्य आरोपी होतात, असं सांगत ठोंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. रुपाली चाकणकर अतिशय नीच आहेत आणि त्यांना या प्रकरणाची सावली माहिती होती, त्यांचं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं वागणं असा घणाघात रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणात पुण्यातील एका महिला समाजसेविका सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत त्यांची तडजोड झाली असा सुद्धा आरोप ठोंबरे यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर यांना आरोपी करा. माझी कायद्याला धरून मागणी आहे. या प्रकरणात कायद्याच्या कलम १२० अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करायलाच पाहिजे, अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. नाशिकच्या भोंदू बाबाचे जे सेक्स रॅकेट समोर आले आहे, त्यामध्ये रूपाली चाकणकर यांचा थेट सहभाग असल्याशिवाय हे शक्य नाही, असा थेट आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. चाकणकर यांनी त्यांच्या संवैधानिक पदाचा वापर करून गेल्या वर्षभरापासून या गुन्हेगारावर कारवाई होऊ नये यासाठी पाठबळ दिले होते, असेही त्या म्हणाल्या.
जर हे प्रकरण आधीच दाबले गेले नसते, तर महिलांवरील अत्याचार तेव्हाच थांबले असते. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळच्या त्यांच्या कृत्यावर ठोंबरे यांनी टीका केली. "मी नाही त्यातली आणि कडी लातली" अशा प्रवृत्तीची ही धूर्त वागणूक आहे, असे त्या म्हणाल्या. जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.