भोंदू खरातकडे ₹१५०० कोटींची संपत्ती, शेकडो एकर जमीन कुठे कुठे लुबाडली? SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat assets Updqate news : अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून जवळपास १५०० कोटींच्या संपत्तीचा संशय व्यक्त केला जात आहे. एसआयटी तपासासोबत आयकर विभागाची एंट्री होणार असून जमीन व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.
Ashok Kharat Case:
Ashok Kharat Case: saam tv
Published On

Ashok Kharat ₹1500 crore assets investigation details : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एन्ट्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. खरातच्या नावावरील सुमारे एकते दीड हजार कोटींची संपत्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्याशिवाय त्यानं शेकडो एकर जमीन लुबाडल्याचा प्रकारही चौकशीतून समोर आला आहे. खरातच्या उत्पन्नाच्या स्रोतांची आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. सामाईक सातबारांमध्ये अनेक सहमालक असून काही बांधकाम कंपन्या आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावेही समोर येत आहेत. जमीन व्यवहारातील एजंट ताब्यात घेतला आहे.

SIT कडून कसून चौकशी

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याची SIT कडून चौकशी सुरू आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा उर्फ कॅप्टन यांची नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात जमीन आणि काही व्यावसायिक भूखंड आहेत. नाशिक शहर ,पाथर्डी गाव, गौळाने, सिन्नर, शिर्डी, वावी या ठिकाणी देखील मोठी माया या भोंदूबाबाने कमावलेली आहे. त्याचे विविध भागात फार्म हाऊस, ऑफिस, जमीन, व्यावसायिक भूखंड, गाळे, बंगले आहेत. अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी येत असल्याचं सांगितलं जातंय. खरातने जमीन व्यवहारात अनेकांचे पैसे बुडवल्याची देखील चर्चा आहे. या सर्व मालमत्तेची चौकशी एसआयटी पथकाकडून केली जात आहे. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरातच्या नातेवाईकांसह मुलगी, पत्नी तसच इतर विश्वासू सहकाऱ्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही मालमत्तांमध्ये अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश असल्याचं बोललं जातंय.

Ashok Kharat Case:
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप

५२ सातबारांवर खरातचे नाव, आयकर विभागाची एंट्री

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री झाली आहे. SIT तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर आले आहेत. - मोठ्या व्यवहारांचे ‘लिंकिंग’ करून संयुक्त तपास केला जाणार आहे.

खरात याचे बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार आहे. खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५२ सातबारांवर खरातचे नाव, अनेक ठिकाणी संशयास्पद नोंदी असल्याचे समोर आले आहे. काही सामायिक सातबाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

Ashok Kharat Case:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी शेवटचे १० दिवस, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

बड्या भक्तांच्या शोधासाठी सीडीआर तपासला जाणार

कॅप्टन खरातच्या बड्या भक्तांच्या शोधासाठी सीडीआर तपासला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन SIT सीडीआर तपासणी करणार आहे. कॅप्टन खरातची ३ दिवसात २० तास चौकशी झाली आहे. तर खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवच्या चौकशीत ४० महिलांचे नंबर पोलिसांना मिळाल्याची माहिती मिळाली आहे. भायखळ्यातून परब तर पुण्यातून खरातचा व्यावसायिक भागीदार असलेल्या जासूद याची देखील एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. नीरज कडून आणखी काही लँड एजंटचे नंबर हस्तगत झाल्याची माहिती मिळाली आहे.

Ashok Kharat Case:
Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, महिला प्रदेशाध्यक्षपद जाणार, मोठी अपडेट आली समोर

भोंदू खरातची तीन मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

भोंदू अशोक खरात याने अटकेच्या तीन दिवस आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यातील तीन मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.. विनोद नामक पंटरने या बैठकीचे नियोजन केले होते.. यातील एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याचे आणि त्याचे अशोक खरात याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. त्यामुळे SIT चौकशीत या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होणार का?बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Ashok Kharat Case:
Kharat Case : भोंदू बाबा खरातचा दक्षिण कोरियातील फोटो समोर, विदेशी दौरे पोलिसांच्या रडारवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com