

Ashok Kharat Case Update News : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. खरातच्या परदेश वाऱ्या आता पोलिसांच्या रडारावर आल्या आहेत. खरात याचे दक्षिण कोरियातील काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोंमुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खरातवर अतिशय गंभीर आरोप कऱण्यात आलेले आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये अशोक खरात आपल्या कुटुंबासोबत दक्षिण कोरियामध्ये आनंद लुटताना आणि मौजमजा करताना दिसत आहे . एका बाजूला भक्ती आणि अध्यात्माचा आव आणणारा हा भोंदू बाबा परदेशात मात्र विलासी जीवन जगत असल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर खरातच्या आर्थिक उलाढालींबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
अशोक खरातने आतापर्यंत किती परदेश दौरे केले आणि या दौऱ्यांसाठी लागणारा पैसा कुठून आला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरातचे सर्व विदेशी दौरे आता 'रडारवर' असून प्रत्येक दौऱ्याची कसून चौकशी केली जाणार आहे. भोंदूगिरीच्या माध्यमातून जमा केलेल्या पैशांचा वापर या सहलींसाठी करण्यात आला का? या दिशेनेही तपास सुरू आहे.
या नवीन अपडेटमुळे खरातच्या काळ्या कारनाम्यांचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता त्याच्या पासपोर्ट आणि ट्रॅव्हल हिस्ट्रीची सखोल तपासणी करणार आहेत. खरात प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उडाले आहे. रूपाली चाकणकर यांचं नावही या प्रकरणात आल्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडाली. या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्विकारून चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेतला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.