Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, महिला प्रदेशाध्यक्षपद जाणार, मोठी अपडेट आली समोर

Rupali Chakankar controversy latest news NCP : अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदावरही टांगती तलवार आहे. पक्षांतर्गत बैठकीत यावर चर्चा झाली असून लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Rupali Chakankar resignation
Rupali Chakankar resignationSaam
Published On

Ashok Kharat case impact on Maharashtra politics : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्यानंतर आता त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'महिला प्रदेशाध्यक्ष' पदावरही टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या बैठकीला हजर होते. या बैठकीत रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा सूर

अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका गटामध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rupali Chakankar resignation
Kharat Case : भोंदू बाबा खरातचा दक्षिण कोरियातील फोटो समोर, विदेशी दौरे पोलिसांच्या रडारवर

देवगिरीवर महत्त्वाची बैठक

रूपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानंतर खरात प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आणि पक्षातील नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी मुंबईतील 'देवगिरी' निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत चाकणकर यांच्या पदाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

Rupali Chakankar resignation
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा याच आठवड्यात राजीनामा, भाजपच्या मुख्यमंत्र्यासाठी ३० मार्च टर्निंग पाईंट का?

अजून अंतिम निर्णय बाकी

सध्या जरी रूपाली चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पण पक्षांतर्गत वाढता दबाव पाहता आगामी काळात त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर पूर्णपणे कोंडीत सापडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांना आणखी एक धक्का बसू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Rupali Chakankar resignation
Rupali Chakankar video : संतापजनक! चाकणकरांचा पराक्रम; भोंदू बाबा खरातची विठ्ठलाशी तुलना, अध्यक्षपद केलं अर्पण

चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितला - रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रूपाली चाकणकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. चाकणकर आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यातील संबंधांमुळे लोकांमध्ये चांगले वातावरण नाही. या भोंदूबाबाने अनेक महिलांची फसवणूक केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला, असे आठवले म्हणाले. या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येत असल्याबाबत विचारले असता, त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर दिले.

Rupali Chakankar resignation
Ashok Kharat : धक्कादायक! भोंदू खरातच्या इशाऱ्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या, धक्कादायक माहिती समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com