अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठे सरकारी अधिकारी आपल्या हव्या त्या ठिकाणी बदल्या (चॉईस पोस्टिंग) करून घेण्यासाठी खरातच्या दरबारात हजेरी लावत होते. ही माहिती समोर येताच राजकीय आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
अनेक बडे शासकीय अधिकारी चॉईस पोस्टिंगसाठी खरातकडे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या खरातच्या इशाऱ्यावरच होत होत्या का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या कामांच्या बदल्यात खरातला रोख रकमेऐवजी जमिनीतील गुंतवणुकीच्या स्वरूपात 'दक्षिणा' दिली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरातचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याची चर्चा केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.