Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं

Nashik Ashok Kharat Case Update: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३ महिलांनी पुढे येत या भोंदूबाबाच्या काळ्या कृत्याचा पाढा वाचून दाखवला. एसआयटीने त्यांचा जबाब नोंदवला.
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं
Ashok Kharat saam tv
Published On

Summary -

  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे

  • आणखी ३ महिलांचे जबाब नोंदवले

  • एसआयटी तपासात महिलांनी सांगितले भोंदूबाबाचे कारनामे

  • प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर तपासादरम्यान त्याचा एकएक कारनामा उघड होत आहे. एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आता आणखी ३ महिलांनी पुढे येत अशोक खरातविरोधात तक्रार दाखल केली. या महिलांनी पोलिसांना अशोक खरातने त्यांच्यासोबत नेमकं काय कृत्य केले याची आपबीती सांगितली. भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकलं आणि त्यांच्यासोबत भयंकर कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. एसआयटी या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे शोधत आहेत. या प्रकरणाचा व्याप्ती वाढत चालली आहे. अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या ३ महिलांची एसआयटीने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी धक्कादायक माहिती दिली. या महिलेचे जबाब एसआयटीने अतिशय संवेदनशीलपणे नोंदवले आहेत. या महिलांचे जबाब नोंदवले गेल्यामुळे आता खरातच्या अडचणी वाढल्या आहेत कारण त्यांच्याविरोधात अधिक सक्षम आणि मजबूत पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड

अशोक खरातने ज्योतिष असल्याचे सांगत अनेक महिलांची फसवणूक केली. या महिलांचे त्याने शोषण केले. अशोक खराच्या पेन ड्राइव्हमधून १०० पेक्षा अधिक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. आतापर्यंत अशोक खरातचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये तो एक महिला आणि अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल कृत्य करत असल्याचे दिसून आले आहे. अशोक खरातचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं
Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातकडे मोठी मालमत्ता आहे. ही संपत्ती त्याने कशी मिळवली याचा देखील तपास केला जात आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये त्याची ३० एकर जमीन असून त्याची किंमत जवळपास १५० कोटींच्या आसपास आहे. मिरगाव आणि कहांडळवाडी या ठिकाणी ४५ एकर जमीन असून त्याची किंमत २ कोटींच्या घरात आहे. पुणे जिल्ह्यातल्या ओझर विमानतळाजवळ त्यांची जमीन असून त्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. गौळाणे शिवारात त्याच्या कुटुंबीयांची जमीन असून त्याची किंमत ३० कोटींच्या आसपास आहे. शिर्डीतील साई मंदिरापासून दीड किमी अंतरावर ४ एकर भूखंड असून त्याची किंमत ५० कोटींच्या आसपास आहे. कर्मयोगीनगर येथे आलिशान बंगला आणि ऑफिस असून त्याची किंमत ५ कोटी आहे. मिरगाव येथे फार्म हाऊस असून त्याची किंमत १३ कोटी आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातची आणखी ३ काळी कृत्य समोर, पीडित महिलांनी SIT समोर सगळं काही सांगितलं
Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com