Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड

IAS Officers Role Under Scanner in Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याची ३ आयएएस अधिकाऱ्यांनी शिर्डीत भेट घेतली होती. या चौघांमध्ये शिर्डीतील हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती.
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat saam tv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणातात मोठी अपडेट

  • अशोक खरातची शिर्डीत ३ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक

  • अटक होण्याच्या ३ दिवस आधी पार पडली बैठक

  • विनोद नावाच्या व्यक्तीने घडवून आणली होती बैठक

अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादाक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातला अटक होण्यापूर्वी त्याची ३ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातच्या अटकेच्या ३ दिवस आधी ही बैठक पार पडली होती. हे आयएएस अधिकारी कोण? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या ३ आयएएस अधिकाऱ्यांची नावं जरी समोर आली नाहीत.

शिर्डीत झाली सिक्रेट मिटिंग -

महत्वाचे म्हणजे, शिर्डीमध्ये अशोक खरात आणि ज्या ३ आयएएस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती ही बैठक विनोद नावाच्या व्यक्तीने घडवून आणली होती. विनोद हा अशोक खरातचा व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. ही बैठक नेमकी कशासाठी घेण्यात आली होती. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिस सध्या या विनोदचा शोध घेत आहेत. आता या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू आहे. यातूनही आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

भोंदूबाबाला अटक कशी केली?

नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. त्याला अटक करताना पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली होती. अटक करण्यासाठी जे पथक पाठवण्यात आले होते त्यामधील काही अधिकाऱ्यांना खरातच्या अटकेची कल्पना नव्हती. घरात चोर घुसल्याचे सांगत पोलिस रात्री खरातच्या घरात गेले आणि त्याला अटक करत पोलिस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांकडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडे असलेल्या पेनड्राइव्हमध्ये पोलिसांनी १०० पेक्षा अधिक व्हिडीओ मिळाले आहेत.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा समोर, अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचाराचा VIDEO व्हायरल

भोंदूबाबाकडे किती संपत्ती?

भोंदूबाबा अशोक खरातकडे मोठी मालमत्ता आहे. पाथर्डीमध्ये त्याची ३० एकर जमीन असून त्याची किंमत जवळपास १५० कोटींच्या आसपास आहे. मिरगाव आणि कहांडळवाडी या ठिकाणी ४५ एकर जमीन असून त्याची किंमत २ कोटींच्या घरात आहे. ओझर विमानतळाजवळ त्यांची जमीन असून त्याची किंमत ५ कोटी इतकी आहे. गौळाणे शिवारात त्याच्या कुटुंबीयांची जमीन असून त्याची किंमत ३० कोटींच्या आसपास आहे. शिर्डीतील साई मंदिरापासून दीड किमी अंतरावर ४ एकर भूखंड असून त्याची किंमत ५० कोटींच्या आसपास आहे. कर्मयोगीनगर येथे आलिशान बंगला आणि ऑफिस असून त्याची किंमत ५ कोटी आहे. मिरगाव येथे फार्म हाऊस असून त्याची किंमत १३ कोटी आहे.

Ashok Kharat: भोंदूबाबा अशोक खरातला भेटणारे ते 3 IAS अधिकारी कोण? शिर्डीत पार पडली सिक्रेट मिटिंग; तपासातून धक्कादायक माहिती उघड
Ashok Kharat: मोठी बातमी! अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com