द्वारका-नाशिकरोड रस्ता होणार १० पदरी; पुणे, शिर्डी, अहिल्यानगरचा सुपरफास्ट प्रवास, असा होईल कायापालट

Nashik Dwarka–Nashik Road: या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. नाशिकहून सिन्नर औद्योगिक वसाहत, पुणे, शिर्डी, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर अशा अनेक भागात ये-जा करणारी वाहने या मार्गावरून जात असतात
Nashik Dwarka–Nashik Road:
Nashik Dwarka–Nashik Road:saam tv
Published On
Summary
  • विस्तारीकरण, डांबरीकरणाच्या कामासाठी २०३ कोटी रुपये खर्चाची निविदा

  • नाशिक शहरातील प्रमुख ३० रस्ते, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

  • विस्तारानंतर हा मार्ग दहा पदरी होणार आहे.

नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मिटणार आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावरील द्वारका चौक ते नाशिकरोडच्या विस्तारीकरणास अखेर मुहूर्त लाभला आहे. या रस्त्याचे विस्तारीकरण,डांबरीकरणाच्या कामासाठी २०३ कोटी रुपये खर्चाची निविदा महापालिकेने काढली आहे. द्वारका चौक ते नाशिकरोड या दरम्यानच्या या ६.४ किलोमीटरच्या टप्प्याात दहा पदरी रस्ता केला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येईल असा अंदाज आहे.

Nashik Dwarka–Nashik Road:
ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होतील, यामुळे शहातील नाशिककडे येणाऱ्या रस्त्यांचे विस्तारीकरण, नवीन वर्तुळाकार मार्ग, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता आणि नाशिक शहरातील प्रमुख ३० रस्ते, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खास प्रकल्प आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान द्वारका ते नाशिकरोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.

Nashik Dwarka–Nashik Road:
शैक्षणिक क्षेत्रातील मोठी बातमी! राज्यातील ३८ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी

नाशिकहून सिन्नर औद्योगिक वसाहत, पुणे, शिर्डी, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर अशा अनेक भागात ये-जा करणारी वाहने या मार्गावरून जात असतात. नाशिकरोडमध्ये प्रमुख शासकीय विभागीय कार्यालये, चलार्थपत्र, भारत प्रतिभृती मुद्रणालय, महावितरण अशी प्रमुख कार्यालये आहेत. यामुळे नोकरदारांसह इतर प्रवाशी वाहतूकीचा मोठा भार या मार्गावर असतो. यामुळे रस्ताचं विस्तार करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने द्वारका ते नाशिकरोड या ६.४ किलोमीटर अंतरात विस्तारीकरणाची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती.

आधी हा ६.४ किलोमीटरचा टप्पा सिमेंट काँक्रिटमध्ये करण्यात येईल,असा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने प्रस्ताव मांडून निधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात झालेल्या चर्चेत सिमेंट कॉक्रिटीकरणऐवजी डांबरीकरणाच्या पर्यायावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महापालिकेने रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी सुधारित प्रस्ताव मांडला. सध्या हा रोड सहापदरी आहे, विस्तारानंतर हा मार्ग दहा पदरी होणार आहे.

द्वारका ते दत्त मंदिर चौक (नाशिकरोड) या मार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामासाठी २०३ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून दुसऱ्या दिवशी त्या उघडल्या जातील. या प्रक्रियेत निवडलेल्या कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. या टप्प्याचे विस्तारीकरण झाल्यानंतर सध्याच्या प्रचंड वाहतूक कोंडीतून नाशिककरांसह भाविक व वाहनधारकांची सुटका होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com