ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

ZP Teachers, Officer Face Suspension : महाराष्ट्रात बदल्यांच्या प्रकरणांमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार जिल्हा परिषद शिक्षक आणि एका पंचायत समिती अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
ZP Teachers, Officer Face Suspension
Zilla Parishad teachers suspended in fake certificate case.saam tv
Published On
Summary
  • बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर उघड.

  • गटशिक्षणाधिकारीवरही कारवाई.

  • शिक्षण विभागात खळबळ.

बनावट व दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी आणि नोकरीमधील सवलत घेणाऱ्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये बनावट व दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेवून बदली मिळवणाऱ्या ४ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच प्रमाणपत्रांची तपासणी न केल्याप्रकरणी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारीचेही निलंबन करण्यात आले आहे.

ZP Teachers, Officer Face Suspension
Guardian Minister: नंदुरबार जिल्ह्याला मिळाला नवा पालकमंत्री,कोणत्या पक्षाच्या नेत्याची लागली वर्णी?

बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी सुद्धा शिक्षकांनी सादर केलेल्या बदली प्रस्तावांची सखोल पडताळणी न केल्याने त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी १३ मार्च रोजी जारी केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत शिक्षकांनी सन २०२५ मध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली घेतली होती. याबाबत शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

ZP Teachers, Officer Face Suspension
शैक्षणिक क्षेत्रातील मोठी बातमी! राज्यातील ३८ महिला पदवी महाविद्यालयांना मंजुरी

त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सातही पंचायत समित्यांचे गट शिक्षणाधिकारी यांना बदली घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यासह तालुका स्तरावरुन संवर्ग एकमधून बनावट अंतराची पडताळणी करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले होते. याप्रकरणात आता पाच जणांवर कारवाई झाली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व इतर चार शिक्षकांचा समावेश आहे.

त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सातही पंचायत समित्यांचे गट शिक्षणाधिकारी यांना बदली घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यासह तालुका स्तरावरुन संवर्ग एकमधून बनावट अंतराची पडताळणी करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले होते. याप्रकरणात आता पाच जणांवर कारवाई झाली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये बाळापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व इतर चार शिक्षकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com